logo

गारेगार प्रवासाच्या नादात २ कोटींचा भुर्दंड; पश्चिम रेल्वेवर ६० हजार विना तिकीट प्रवाशांची धरपकड

मुंबई, दि. ८ : प्रतिनिधी
थंडा थंडा कूल कूल प्रवास, तोही विना तिकीट प्रवाशांना चांगलाच महागात पडला आहे. पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६० हजार प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करत तब्बल दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास, सामान आरक्षित न करता घेऊन जाणे अश्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, हाॅलिडे स्पेशलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीच्या विशेष चमूने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल १७३.८९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, मार्च २०२४ मध्ये सामान बूक न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २.७५ लाखांचा दंड वसूल केला. तर, विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईतून १६.७७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

9
1554 views